Sambhajinagar News : औरंगजेब कबरीचा वाद; संभाजीनगरचे जिल्हाधिकारी काय म्हणाले?

| Updated on: Mar 17, 2025 | 2:27 PM

Collector Dilip Swami : औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झालेल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आंदोलन देखील करण्यात येत आहेत. या प्रकरणावर संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

औरंगजेबाची कबर हटवण्यात यावी या मागणीसाठी मोठ्याप्रमाणात निवेदन येत असल्याच संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी म्हंटलं आहे. गेल्या आठ दिवसात बजरंग दलासह अनेकांनी ही कबर काढून टाकावी यासाठी निवेदन दिले आहेत असं ते म्हणाले. याठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आम्ही सतर्क आहे असंही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी म्हंटलं. खुलताबाद आणि वेरूळमध्ये कडेकोट बंदोबस्त लावल्याचंही त्यांनी सांगितलं. राज्यात औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झालेल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आंदोलन देखील करण्यात येत आहेत. त्यामुळे संभाजीनगरच्या खुलताबाद परिसरात ज्या ठिकाणी ही कबर आहे तिथे प्रशासनाकडून कडक बंदोबस्त लावण्यात आलेला आहे, तसंच सुरक्षेच्या दृष्टीने सर्व खबरदारी घेण्यात आलेली असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

Published on: Mar 17, 2025 02:27 PM
Satish Bhosale : खोक्याचं पोलिस कोठडीत अन्नत्याग आंदोलन, केली ही मोठी मागणी
Ladki bahin Yojana Video : ‘लाडकी बहीण’वर अजितदादांचं मोठं वक्तव्य; योजनेत दुरूस्ती होणार, महिलांचे पैसे परत…