पवारांच्या स्क्रीप्टप्रमाणे पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादीच्या वळसनीला बांधला; नरेश म्हस्केंची कोणावर खरमरीत टीका

| Updated on: Apr 09, 2023 | 8:46 AM

पाप करणारेच रामलल्लाच्या दर्शनाला जात आहेत अशी टीका उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली होती. त्या टीकेला नरेश म्हस्के यांनी खरमरीत उत्तर दिलं आहे

अयोध्या : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सत्ता स्थापनेनंतर पहिल्यांदाच अयोध्या दौऱ्यावर आहेत. तेथे उत्सहाचे आहे. यादरम्यान पाप करणारेच रामलल्लाच्या दर्शनाला जात आहेत अशी टीका उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली होती. त्या टीकेला नरेश म्हस्के यांनी खरमरीत उत्तर दिलं आहे. म्हस्के यांनी, दरोज सकाळी वाजणारा भोंगा असे राऊत यांना म्हणत टीका केली. तर राऊत यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष केवळ खुर्ची करता शरद पवार यांच्या स्क्रीप्ट प्रमाणे काँग्रेस, राष्ट्रवादीच्या वळसनीला बांधला असे म्हटलं आहे. तर राऊत यांच्यामुळे आम्हाला हिंदुरुदय सम्राट म्हणताना जीभ जड व्हायची. आम्हाला जनाब बाळासाहेब ठाकरे म्हणावं लागत होतं अशीही टीका केली आहे.

Published on: Apr 09, 2023 08:46 AM
याच्याआधीचा अयोध्या दौरा हा केवळ लोकांच्या डोळ्यात धुळपेत करणारा; शिवसेना नेत्याची ठाकरेंवर जळजळीत टीका
आ रहे है भगवाधारी ! अयोध्येत शिंदे-फडणवीस यांच्या स्वागताचे बॅनर