शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून ‘हे’ सरकार धर्माच्या नावावर पर्यटनाला गेलय; संजय राऊत

| Updated on: Apr 09, 2023 | 1:02 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी टीका केली आहे. याचमुद्द्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील टीका केली आहे

मुंबई : अयोध्येत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि मंत्री मंडळ गेले आहे. त्याचदरम्यान राज्यात पुन्हा एकदा अवकाळीने सुरूवात करत शेतकऱ्याच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावला आहे. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी टीका केली आहे. याचमुद्द्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील टीका केली आहे. राऊत यांनी, गेल्या 72 तासात अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळं राज्य हैराण झालं आहे. पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भातील शेतकरी संकटात सापडा आहे. मात्र या सरकार अधिवेशनातल्या घोषणांचा विसर पडला. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून हे सरकार धर्माच्या नावावर पर्यटनाला गेल्याची टीका राऊत यांनी केली आहे.

Published on: Apr 09, 2023 01:02 PM
सुरत आणि गुवाहाटी ऐवजी अयोध्येला का गेला नाही? शिंदेंना राऊतांचा प्रश्न
‘रामराज्य’ म्हणता आणि रावणासारखा कारभार करता; ठाकरे गटाच्या खासदाराचं शिवसेनेवर टीकास्त्र