योगी आदित्यनाथ यांच्यासोबतच्या बैठकीत काय चर्चा झाली? एकनाथ शिंदे यांनी सविस्तर सांगितलं…
खूप लोकांनी अयोध्या यात्रेत सहभाग घेतला. देवदर्शन, आरती, हनुमान गढी, संत महंतांनी आशीर्वाद दिले. शरयू नदीची आरती केली, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
लखनौ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अयोध्या दौरा केला. तेव्हा त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली? याबाबत एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली. “उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मी भेटलो. त्यांनी स्नेहभोजनाचा आमंत्रण दिलं होतं. आम्ही सगळे गेलो होतो. त्यांचं राज्य, आपलं राज्य तसंच काही योजनांबाबत तिथे चर्चा झाली. तिकडे महाराष्ट्र भवनाच्या इमारतीच्या जागेसाठी चर्चा झाली. महाराष्ट्रातील खूप मोठ्या प्रमाणावर राम भक्त, भाविक अयोध्येला येत असतात. त्यामुळे त्यांची सोय तिकडे झाली पाहिजे. त्यासाठी लागणारी जागाही देण्याचं त्यांनी मान्य केलं आहे. अयोध्येत हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र भवन होणार आहे. या मुद्द्यांवर आमची सविस्तर चर्चा झाली”, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.