मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अयोध्या दौऱ्यावर; ठिकठिकाणी स्वागताचे बॅनर्स

| Updated on: Apr 09, 2023 | 10:14 AM

CM Eknath Shinde And Devendra Fadnavis Ayodhya Daura : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या अयोध्या दौऱ्यासाठी विशेष तयारी करण्यात आली आहे. ठिकठिकाणी बॅनर्स लावण्यात आले आहेत. पाहा व्हीडिओ...

अयोध्या : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज प्रभू श्रीरामाची भूमी असलेल्या अयोध्येत दाखल होणार आहेत. मुख्यमंत्री शिंदे लखनौहून थेट अयोध्येतील रामकथा पार्कमधील हेलिपॅडवर उतरणार आहेत. हेलिपॅडजवळ उत्तर प्रदेश पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.बॉम्ब स्कॉटची टीम हेलिपॅड परिसराची तपासणी करत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राम कथा पार्कमधून पंचशील हॉटेलकडे जाणार आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांच्या अयोध्येत आगमनापूर्वी हेलिपॅडवर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.तसंच राम कथा पार्क ते पंचशील हॉटेलपर्यंत कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या अयोध्या दौऱ्यासाठी विशेष तयारी करण्यात आली आहे. ठिकठिकाणी पोस्टर्स आणि बॅनर्स लावण्यात आले आहेत.

Published on: Apr 09, 2023 10:14 AM
लोकांची कशी सेवा करावी हे आम्हाला शिकण्याची गरज नाही; पवारांच्या टीकेला केसरकरांच प्रत्युत्तर
राष्ट्रवादी भाजपची बी टीम आहे का?; मनसे नेत्याने हा सवाल का केला?