Special Report | एकनाथ शिंदे यांच्यामुळे भाजप सत्तेत, बच्चू कडू का झाले आक्रमक?

| Updated on: Jun 15, 2023 | 8:31 AM

शिवसेनेच्या जाहिरीतमुळे भाजपमध्ये नाराजीचं वातावरण असताना, आमदार बच्चू कडू यांच्या वक्तव्याने त्यात भर घातली आहे. 'राष्ट्रात मोदी, राज्यात शिंदे' या जाहिरातीवरून महायुतीत वादाची ठिणगी उडाली आहे. भाजप नेत्यांमध्ये या जाहिरातीवरून नाराजी व्यक्त केली जात असताना, बच्चू कडू यांनी भाजपवरच हल्लाबोल चढवला आहे.

अमरावती : शिवसेनेच्या जाहिरीतमुळे भाजपमध्ये नाराजीचं वातावरण असताना, आमदार बच्चू कडू यांच्या वक्तव्याने त्यात भर घातली आहे. ‘राष्ट्रात मोदी, राज्यात शिंदे’ या जाहिरातीवरून महायुतीत वादाची ठिणगी उडाली आहे. भाजप नेत्यांमध्ये या जाहिरातीवरून नाराजी व्यक्त केली जात असताना, बच्चू कडू यांनी भाजपवरच हल्लाबोल चढवला आहे. “एकनाथ शिंदे यांनी उठाव केला नसता, तर भाजप सत्तेत नसती. मात्र तरीही 40 आमदारांच्या मतदारसंघात भाजपकडून त्रास होत असल्याचा” थेट आरोप बच्चू कडू यांनी केला आहे. या आरोपनंतर शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी “बच्चू कडू बरोबर बोलले, वाजपेयींचं सरकार एका मतानं पडलं होतं”, असा इशारा दिला आहे. बच्चू कडू यांच्या या आरोपानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी “बच्चू कडू यांनी असं बोलू नये”, अशी प्रतिक्रिया दिली आहे. आधी जाहिरात, आता बच्चू कडू यांच्या विधानामुळे महायुतीत वाद चिघळणार का? यासाठी पाहा स्पेशल रिपोर्ट…

Published on: Jun 15, 2023 08:30 AM
अखेर आशिष देशमुख यांचा नवा आशियाना ठरला; करणार घरवापसी, प्रवेशचा मुहूर्त ही ठरला
जाहिरातीवरुन वाद पेटला! शिंदे गटाच्या आमदाराने थेट भाजपला इशाराच दिला, म्हणाला, ‘फक्त जाणीव ठेवा’