“…म्हणून मी मंत्रिपदाचा दावा सोडला,” बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं कारण…
अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी मंत्रिपदासाठीचा दावा सोडला असल्याचे जाहीरपणे सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांची अडचण कमी व्हावी यासाठी मी मंत्रीपदाचा दावा सोडतो, असं ते म्हणाले. दरम्यान बच्चू कडू यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे.
नागपूर, 20 जुलै 2023 | अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी मंत्रिपदासाठीचा दावा सोडला असल्याचे जाहीरपणे सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांची अडचण कमी व्हावी यासाठी मी मंत्रीपदाचा दावा सोडतो, असं ते म्हणाले. दरम्यान बच्चू कडू यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले की, “मी मंत्री पदासाठी खूप आग्रही होतो, मात्र आता मागणी वाढली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची अडचण वाढू नये, तेवढी समजदारी घेतली पाहिजे. म्हणून मी माझा दावा सोडला. दुसऱ्या कोणाला संधी मिळेल. दिव्यांग मंत्रालय भेटलं आणि माझी इच्छा आता मंत्रिपदावर काम करण्याची नाहीये. एकनाथ शिंदे यांच्यासाठी त्याग म्हणून नाही कर्तव्य म्हणून मी दावा सोडला.”
Published on: Jul 20, 2023 09:25 AM