अनिल बोंडे यांच्या ‘त्या’ विधानावरून बच्चू कडू आक्रमक; म्हणाले, “लायकी पाहून बोलावं”

| Updated on: Jun 15, 2023 | 11:39 AM

भाजप खासदार अनिल बोंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर बोचरी टीका केली. बेडूक कितीही फुगला तरी तो हत्ती होत नाही, असा टोला बोडेंनी लगावला आहे.

नागपूर : भाजप खासदार अनिल बोंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावक बोचरी टीका केली. बेडूक कितीही फुगला तरी तो हत्ती होत नाही, असा टोला बोडेंनी लगावला आहे. अनिल बोंडे यांच्या टीकेनंतर आता शिवसेना आक्रमक झाली आहे. आमदार बच्चू कडू यांनी अनिल बोंडे यांच्यावर सडकून टीका केली आहे.बोंडेंसारख्या व्यक्तीने आपली लायकी पाहूण बोलायला पाहिजे.बोंडे मुख्यमंत्र्यांबाबत काहीही बोलतात. बोंडेंसारख्या सामान्य कार्यकर्त्यांनी सांभाळून बोलावं. अक्कल नसल्यासारखं बोलू नये, असा निशाणा बच्चू कडू यांनी दिला आहे.

Published on: Jun 15, 2023 11:39 AM
“शरद पवार हे वैचारिक व्हायरस”, गुणरत्न सदावर्ते यांची पुन्हा जीभ घसरली!
’50 कुठं आणि 105 कुठं?, देवेंद्र फडणवीस बस नाम ही काफी है’, भाजपने बॅनर लावत शिवसेनेला डिवचलं