कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेऊनच एकनाथ शिंदे यांनी बंड केलं, निकाल आमच्याच बाजूने; कुणाचं वक्तव्य?

| Updated on: Feb 16, 2023 | 3:52 PM

राज्यातील राजकीय पेचप्रसंगावरील सुनावणीचा आज तिसरा दिवस आहे. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत निकाल राखून ठेवण्यात आला आहे. त्यावर प्रहाचे नेते बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पाहा काय म्हणालेत....

नागपूर : राज्यातील राजकीय पेचप्रसंगावरील सुनावणीचा आज तिसरा दिवस आहे. आज या सत्तासंघर्षावर सुनावणी होतेय. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत निकाल राखून ठेवण्यात आला आहे. त्यावर प्रहाचे नेते बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवलाय. पण आम्हाला निकालाची चिंता नाही. कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेऊनच एकनाथ शिंदे यांनी बंड केलंय, त्यामुळे निकाल कायद्याच्या म्हणजेच आमच्या बाजूनं लागणार. निवडणूक आयोगही आमच्याच बाजूनं निकाल देणार” असा विश्वास बच्चू कडू यांनी व्यक्त केलाय. महाविकास आघाडी सरकारमध्ये आधी विधानसभा अध्यक्षांचा राजीनामा दिला. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेला राजीनामा दिला. अशा त्यांनी केलेल्या चुकांचा आम्हाला फायदा झालाय, असंही बच्चू कडू म्हणालेत.

Published on: Feb 16, 2023 03:13 PM
‘स्वतः ढोंगी असलेल्या माणसाने दुसऱ्याला ढोंगी म्हणू नये’, चंद्रशेखर बावनकुळे यांचा कुणावर निशाणा?
राज्याच्या सत्तासंघर्षातील युक्तीवादात नबाम रेबिया खटला ठरणार कळीचा मुद्दा, बघा काय आहे उज्ज्वल निकम यांचे मत?