“5-7 महिन्यांसाठी मंत्रिमंडळ विस्तार करुन फायदा काय?, थोड्याच दिवसात …”; बच्चू कडू यांचा मोठा दावा

| Updated on: Aug 05, 2023 | 10:34 AM

शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाच विस्ताराला अद्याप मुहुर्त सापडलेला नाही आहे. पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी चर्चा होती, मात्र अधिवेशाचे सूप वाजले तरीही विस्तार झालेला नाही. अशाताच प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी मंत्रिमंडळ विस्तारावरून मोठं विधान केलं आहे.

नागपूर, 5 ऑगस्ट 2023 | शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाच विस्ताराला अद्याप मुहुर्त सापडलेला नाही आहे. पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी चर्चा होती, मात्र अधिवेशाचे सूप वाजले तरीही विस्तार झालेला नाही. अशाताच प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी मंत्रिमंडळ विस्तारावरून मोठं विधान केलं आहे. ते म्हणाले की, “राज्य सरकारने आता मंत्रिमंडळ विस्तार करून फायदा नाही. थोड्याच दिवसात आचारसंहिता लागणार आहे. पाच सात महिन्यांसाठी मंत्रिमंडळ विस्तार करून फायदा नाही. विस्ताराच्या दिवशी मी परदेशात असेन.”

Published on: Aug 05, 2023 10:34 AM
सचिन तेंडुलकर यांच्या ‘त्या’ जाहिरातीवर बच्चू कडू यांचा आक्षेप; म्हणाले, “हे चुकीचं…”
नदीत सोडलेल्या मळीमिश्रीत पाण्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात? कुठं घडला धक्कादायक प्रकार?