खातेवाटपावरून बच्चू कडू यांची नाराजी कायम? म्हणाले, “अजित पवार गटाला सोयीनुसार खातं मिळालं”
अजित पवार राष्ट्रवादीचा एक गट घेऊन सत्तेत सामील झाले. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. सत्तेत सामील झाल्यानंतर लगेचच अजित पवार आणि त्यांच्या आमदारांना महत्वाची खाती मिळाल्यामुळे कुठेतरी शिंदे गटात नाराजी असल्याची चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर प्रहार गटाचे आमदार बच्चू कडू यांनी मोठं विधान केलं आहे.
कोल्हापूर: अजित पवार राष्ट्रवादीचा एक गट घेऊन सत्तेत सामील झाले. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. सत्तेत सामील झाल्यानंतर लगेचच अजित पवार आणि त्यांच्या आमदारांना महत्वाची खाती मिळाल्यामुळे कुठेतरी शिंदे गटात नाराजी असल्याची चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर प्रहार गटाचे आमदार बच्चू कडू यांनी मोठं विधान केलं आहे. ते म्हणाले की, “खाती वाटपात मागून आलेल्या राष्ट्रवादीला झुकतं माफ मिळालेलं दिसतंय. जे राहिलेले आहेत, त्यांच्या नशिबी काय येईल हे माहिती नाही. पण जे अजितदादांना दिलंय ते त्यांच्या मतानुसार आणि सोयीनुसारच दिल्याचं दिसून येतंय. राष्ट्रवादीने व्यवस्थित दबाव टाकलाय. ते यशस्वी झालेत असं वाटतं. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांचा वॉच अजित पवार यांच्यावर राहील.”
Published on: Jul 16, 2023 08:10 AM