आमदार अपात्रतेचा निर्णय कोणाच्या बाजूने लागणार? बच्चू कडू यांच्या विधानाने चर्चेला उधाण

| Updated on: Aug 09, 2023 | 10:00 AM

शिवसेनेच्या आमदार अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे पुढच्या आठवड्यात सुनावणी घेणार आहेत. यावर प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी मोठं विधान केलं आहे.

अमरावती, 09 ऑगस्ट 2023 | शिवसेनेच्या आमदार अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे पुढच्या आठवड्यात सुनावणी घेणार आहेत. त्यामुळे आता आमदारांच्या प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात होणार आहे. ठाकरे गटाच्या 14 आमदारांपासून सुनावणीला सुरुवात होईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दररोज एका आमदाराची सुनावणी होणार आहे, अशी देखील माहिती समोर आली आहे. यावर प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी मोठं विधान केलं आहे. ते म्हणाले की, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जी तयारी केली आहे. ती मजबूतीने केली आहे. त्यामुळे निश्चितच आमदार अपात्रतेचा निर्णय शिंदे यांच्या बाजूने लागणार.”

 

Published on: Aug 09, 2023 10:00 AM
रत्नागिरीतल्या नागरिकांच्या खिशाला चाट; बहुतांश भाज्या शंभरीच्या पटीत
मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी एकनाथ शिंदे यांची डिनर डिप्लोमसी; आमदारांसह स्नेहभोजन, कारण नेमकं काय?