सध्या आमची भूमिका तटस्थ, वाट पाहू नाही तर गेम करू, बच्चू कडू यांची थेट धमकी

| Updated on: Jan 14, 2024 | 1:52 PM

प्रहार जनशक्तीचे आमदार बच्चू कडू यांनी भाजपाला पुन्हा आव्हान दिले आहे. महायुतीची लोकसभा जागा संदर्भात अमरावतीला बैठक आहे. अमरावतीच्या या बैठकीला न जाण्याचे आमदार बच्चू कडू यांनी जाहीर केले आहे. भाजपाला जेवढी लोकसभा महत्वाची आहे. तेवढीच आमच्यासाठी विधानसभा महत्वाची आहे असेही आमदार बच्चू कडू यांनी म्हटले आहे. आम्ही सध्या तटस्थ आहोत, वाट पाहू अन्यथा गेम करु अशी थेट धमकीच बच्चू कडू यांनी दिली आहे.

मुंबई | 14 जानेवारी 2024 : महायुतीच्या अमरावतीच्या लोकसभा निहाय बैठकीला आपण मुद्दामहून जाणार नाही. सध्या आमची भूमिका तटस्थ आहे. आम्ही वाट पहातोय. भाजपाला जेवढी लोकसभा महत्वाची आहे. तेवढीच आम्हाला विधानसभा महत्वाची आहे. भाजपाच्या डोक्यात विधानसभा आहे. आमच्या डोक्यात विधानसभा आहे. आमची भूमिका काय आहे ? हे वेळ आल्यावरच सांगू असे आव्हान प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी म्हटले आहे. आमचा मतदार संघ सोडून दोन नगर पंचायती प्रहारच्या आहेत तेथेही आम्हाला निधी मिळालेला नाही असेही बच्चू कडू यांनी म्हटलेले आहे. विधान परिषदेबाबत भाजपा काय निर्णय घेणार आहे. त्यांनी समोरासमोर बसून निर्णय घ्यावा त्यानंतर मग आम्ही तयारीला लागू असेही बच्चू कडू यांनी म्हटले आहे. विधानसभेबाबत भाजपाचे चित्र स्पष्ट होत नाही तोपर्यंत आम्ही तटस्थ राहू, वाट पाहू अन्यथा आम्ही गेम करू असेही आमदार बच्चू कडू यांनी भाजपाला आव्हान दिले आहे.

Published on: Jan 14, 2024 01:51 PM
कुणी काकाचा पक्ष चोरतोय, कुणी बापाचा पक्ष चोरतोय, संजय राऊत कडाडले
मराठ्यांच्या आरक्षणाविरोधात जो बोलेल त्याला सोडणार नाही, जरांगे पाटील यांनी सुनावले