“आमदारांच्या बायकाही विचारतात…काहो फोन येणार का तुम्हाले?”; बच्चू कडू यांचा मिश्किल टोला
शिंदे-फडणवीस सरकारला सत्तेत येऊन एक वर्ष झालं, तरी अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. त्यात राष्ट्रवादीही सत्तेत सामील झाल्याने कोणाला कोणती खाती मिळणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे. तिन्ही पक्षाचे आमदार मंत्रिपदाची आस लावून बसले आहेत. दरम्यान या आमदारांची माजी मंत्री बच्चू कडू यांनी खिल्ली उडवली आहे.
अमरावती : शिंदे-फडणवीस सरकारला सत्तेत येऊन एक वर्ष झालं, तरी अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. त्यात राष्ट्रवादीही सत्तेत सामील झाल्याने कोणाला कोणती खाती मिळणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे. तिन्ही पक्षाचे आमदार मंत्रिपदाची आस लावून बसले आहेत. दरम्यान या आमदारांची माजी मंत्री बच्चू कडू यांनी खिल्ली उडवली आहे.”बरेचजण फोनची वाट पाहत आहेत. आम्ही त्या दिवशी बसलो होतो. दोन खासदार होते. तुला फोन आला का? असं ते एकमेकांना विचारत होते. एकजण खोटे बोलला, म्हणाला, मला फोन आला. त्यामुळे चार पाच खासदार दिल्लीला पळाले. त्याला फोन आला आणि आम्हाला का नाही आला? असा प्रश्न त्यांना पडला. जशी निकालाची आपण वाट पाहतो. तशीच आमदार फोनची वाट पाहत आहेत. प्रत्येकाला वाटतं मंत्री झालो पाहिजे. भरत गोगावले हे त्यापैकी एक आहे. बऱ्याच जणांचा यज्ञ सुरू आहे. बायकोही विचारते….”, बच्चू कडू नेमंक काय म्हणाले यासाटी पाहा हा व्हिडीो…