Chandrasekhar Bawankule | उद्धव ठाकरे यांच्यावर वाईट काळ आला आहे, त्यांनी आत्मपरीक्षण करावे, बावनकुळेंची टीका

| Updated on: Aug 26, 2022 | 5:56 PM

Chandrasekhar Bawankule | भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुन्हा उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

Chandrasekhar Bawankule | भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी पुन्हा उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांच्यावर टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर वाईट काळ आला आहे. आता तरी त्यांना आत्मपरीक्षण करावे असा टोला ही त्यांनी लगावला. तर 2019 च्या निवडणुकीत संभाजी ब्रिगेड (Sambhaji Brigade) यांनी 40 जागांवर निवडणूक लढवली होती. त्यांना या निवडणुकीत 0.06 टक्के मिळाली होती. उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती करायला राज्यातील कोणताही महत्वाचा आणि मोठा पक्ष तयार नाही. गेल्या अडीच वर्षांच्या त्यांच्या कार्यकाळात राज्याची दुर्गती झाली. राज्याचा विकास खुंटला. त्यामुळे त्यांना आता 0.06 टक्के मत घेणाऱ्या पक्षासोबत युती करावी लागत असल्याचा चिमटा ही त्यांनी काढला. संभाजी ब्रिगेडशी युती करुन ठाकरे यांच्या हाताला काहीच लागणार नाही. आता उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला शेवटची घरघर लागल्याचा टोला ही त्यांनी लगावला.

Navneet Rana | उद्धव ठाकरेंमध्ये दम नाही, नवनीत राणांची जहरी टीका
‘बरं झालं शिंदे गेले, असंगाशी संग तुटला’ उध्दव ठाकरे