…तर इतकी वर्षे राष्ट्रवादीने जनतेची फसवणूक केली; प्रकाश आंबेडकरांचा घणाघात

| Updated on: Apr 30, 2023 | 8:03 AM

Prakash Ambedkar on NCP : मविआच्या वज्रमूठ सभेला जाणार का?; प्रकाश आंबेडकर यांनी वंचितची स्पष्ट केली. पाहा व्हीडिओ...

बदलापूर : वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादीवर घणाघात केलाय. राष्ट्रवादी आधी स्वत:ला शाहू, फुले, आंबेडकरवादी म्हणवत होती. आता ते भाजपसोबत जात असतील तर त्यांनी इतकी वर्ष फसवलं आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. राष्ट्रवादी सरड्यासारखा रंग बदलतेय. पूर्वी शाहू, फुले, आंबेडकरी विचारांचा त्यांचा रंग होता. आता भाजप आणि शिवसेनेचा जो रंग आहे तसा राष्ट्रवादीचा होतोय की काय अशी चर्चा सुरू झालीये, असंही प्रकाश आंबेडकर म्हणालेत. आम्ही आधीच स्पष्ट केलं आहे की, महाविकास आघाडीसोबत आमचा काही समझोता नाही, संबंध नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने जाहीर केलं आहे की, आम्ही वंचित बहुजन आघाडीसोबत समझोता करू शकत नाही, त्यामुळे त्या सभेचा आणि आमचा काही संबंध नाही, असंही ते म्हणालेत.

Published on: Apr 30, 2023 07:57 AM
लहानपणात डोळे मारले नसतील, म्हणून या वयात…; अजित पवार यांच्यावर सत्तारांची खोचक टीका
प्रकाश आंबेडकर यांनी केलं अजित पवार यांचं कौतुक; म्हणाले…