बागेश्वर बाबा चमत्कार दाखवा, ३० लाख घेऊन जा, अंधश्रध्दा निर्मूलन समितीने दिले आव्हान

| Updated on: Jan 20, 2023 | 1:56 PM

छत्तीसगडचे बागेश्वर बाबा आणि महाराष्ट्रातील अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे श्याम मानव यांच्यामध्ये चमत्कार दाखविण्यावरून आव्हान आणि प्रतिआव्हान सुरु आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण?

जयपूर : मी इतरांच्या मनातील ओळखतो ही माझ्या गुरुची कृपा आहे. सनातनच्या मंत्राची ताकद आहे, असा दावा करणारे बागेश्वर बाबा यांना अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे श्याम मानव यांनी आव्हान दिले आहे. बागेश्वर बाबा आपल्या दिव्यदृष्टीचा चमत्कार सिद्ध करून दाखवा आणि 30 लाख रुपये घेऊन जा, असे आव्हान श्याम मानव यांनी दिले आहे.

श्याम मानव यांनी दिलेले आव्हान बागेश्वर बाबा यांनी स्वीकारले आहे. मी चमत्कार सिद्ध करून दाखविण्यास तयार आहे. पण मी नागपूरला येणार नाही. तुम्हीच रायपूरला या. आम्ही सर्व काही उघड करू. बंद दरवाजाआड काही करणार नाही, असे प्रतिआव्हान त्यांनी दिले आहे.

पण, श्याम मानव यांनी हे प्रतिआव्हान नाकारले आहे. रायपूरला तुमची माणसे, तुमचा मंच असेल. आव्हान नागपुरात पूर्ण होईल. दहा लोकांच्या उपस्थितीत आपण निर्णय करू असे ते म्हणाले आहेत.

Published on: Jan 20, 2023 01:56 PM
गाड्यांची काचा फोडण्याची त्याला चढली झिंग, जिथे गुन्हा केला तिथेच काढली पोलिसांनी धिंड
वेळ आल्यावर उत्तर देणार, निलंबित होताच सत्यजित तांबे यांचा सूचक इशारा