“मृतांच्या कुटुंबियांना 25 लाखांची मदत द्या”, मनसेची सरकारकडे मागणी
इर्शाळवाडीतील घटना ही हृदय पिळवटून टाकणारी आहे. आतापर्यंत या दुर्घटनेत 16 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 21 जणांना वाचवण्यात यश आलं आहे.दरम्यान या दुर्घटनेची माहिती मिळताच मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी इर्शाळवाडी गावाला भेट दिली.
रागयड, 21 जुलै 2023| इर्शाळवाडीतील घटना ही हृदय पिळवटून टाकणारी आहे. आतापर्यंत या दुर्घटनेत 16 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 21 जणांना वाचवण्यात यश आलं आहे.दरम्यान या दुर्घटनेची माहिती मिळताच मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी इर्शाळवाडी गावाला भेट दिली. तिथला दरडग्रस्त ग्रामस्थांची विचारपूस केली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, “त्वरित सरकारने या गावची जबाबदारी घ्यावी व पंतप्रधान आवास योजना किंवा त्यांच्या योजनेअंतर्गत यांचं पुनर्वसन करावं.मृतांना 25 लाख रुपये तर जखमींना देखील मदत करावी. सत्तापक्ष आणि विरोधक यांनी यावर राजकारण करू नये, अशी आमची विनंती आहे.”
Published on: Jul 21, 2023 11:10 AM