“खोटं बोल पण रेटून बोल, ही जितेंद्र आव्हाड यांची प्रवृत्ती”, कोणी केली टीका?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेले शिवसेनेचे आमदार डॉ. बालाजी किणीकर हे मातोश्रीवर जाण्याचा प्रयत्न करत असून ते कुणाच्या संपर्कात आहेत आणि कुणाच्या माध्यमातून निरोप पाठवत आहेत हे मला माहिती आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला होता. यावर बालाजी किणीकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेले शिवसेनेचे आमदार डॉ. बालाजी किणीकर हे मातोश्रीवर जाण्याचा प्रयत्न करत असून ते कुणाच्या संपर्कात आहेत आणि कुणाच्या माध्यमातून निरोप पाठवत आहेत हे मला माहिती आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला होता. यावर बालाजी किणीकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.”जितेंद्र आव्हाड यांच्या शब्दाला महाराष्ट्रात किंमत नसून खोटं बोल पण रेटून बोल, ही त्यांची प्रवृत्ती आहे. त्यामुळे त्यांच्या बोलण्यावर स्पष्टीकरण देण्याची मला गरज वाटत नाही”, अशा शब्दात शिवसेना आमदार बालाजी किणीकर यांनी जितेंद्र आव्हाड यांना प्रत्युत्तर दिलंय.
Published on: Jun 04, 2023 02:58 PM