पद यात्रा काढली, जमावबंदीचा आदेश धुडकावला; ठाकरे गटाच्या आमदारावर गुन्हा दाखल

| Updated on: Apr 13, 2023 | 10:58 AM

अमरावती आणि अकोला जिल्ह्यातील खाऱ्या पाण्याचा प्रश्न घेऊन नागपूरला देवेंद्र फडणवीसांकडे जाताना त्याच्यावर जमावबंदीचे आदेश धुडकावून लावल्या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

नागपूर : बाळापूर मतदारसंघातील शिवसेना आमदार नितीन देशमुख हे बेपत्ता झाल्याच्या बातमीने राज्यात खळबळ उडवून दिली होती. त्यांची प्रांजल देशमुख यांनी तशी तक्रार पोलिसांत दिली होती. तेच आमदार नितीन देशमुख आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. देशमुख यांच्यासह त्यांच्या समर्थकांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

अमरावती आणि अकोला जिल्ह्यातील खाऱ्या पाण्याचा प्रश्न घेऊन नागपूरला देवेंद्र फडणवीसांकडे जाताना त्याच्यावर जमावबंदीचे आदेश धुडकावून लावल्या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू असताना नितीन देशमुख आणि त्यांच्या १०० पेक्षा जास्त कार्यकर्त्यांनी पदयात्रा काढली. त्यावरून हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

 

Published on: Apr 13, 2023 10:50 AM
Nashik City Bus : नाशिककरांच्या लाइफलाईनला ब्रेक, सिटीलिंक बससेवा ठप्प
Mumbai Temperature : रात्री पाऊस, दिवसा कडकडीत ऊन; मुंबईत असं वातावरण का बदलतंय?