विधानभवनात बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र, संजय राऊत म्हणाले, बाप चोरणारी टोळी

| Updated on: Jan 18, 2023 | 11:50 AM

आपल्याकडे परंपरा पाळल्या जात नाहीत. महाराष्ट्रात सूड आणि बदला घेण्याचं राजकारण सुरू आहे. हे निश्चित आहे,

मुंबई : विधान भवनातील ( vidhan bhavan ) सेंट्रल हॉल येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ( shivsena chief balasaheb thackarey ) यांचे तैलचित्र लावण्यात येणार आहे. या सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेत माजी मुख्यमंत्री आणि बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे ( uddhav thackarey ) यांचे नाव छापण्यात आले नाही. यावरून शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत ( sanjay raut ) यांनी शिंदे गटावर ( shinde group ) निशाणा साधला आहे.

उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांना या सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले नाही. बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र लावण्यामागे एक राजकारण आहे. राज्यात बाप चोरणारी टोळी सक्रिय झालीय हे पुन्हा एकदा सिद्ध झाले असा टोला त्यांनी लगावला आहे.

सावरकरांचं तैलचित्र लावले तेव्हा त्यांच्या नातेवाईकांचे निमंत्रण पत्रिकेवर नाव छापले होते. ही परंपरा आहे. शिष्टाचार आहे. पण, बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र लावत असताना त्यांचे चिरंजीव मुख्यमंत्री होते. त्यांना बोलावले जात नाही याचा अर्थ तुम्ही राजकारण करत आहात असा टोला त्यांनी सरकारला लगावला.

सत्यजित तांबे यांचा सोशल माध्यमावरून काँग्रेसला रामराम, यासह आणखी घडामोडी २४ बातम्यांमध्ये
FARAJ MALIK : नबाव मलीक यांचा फराज मलीक याच्यावर गुन्हा दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?