पुढील निवडणूका बॅलेटपेपरवर घ्याव्यात, बाळासाहेब थोरात यांची मागणी

| Updated on: Nov 27, 2024 | 6:30 PM

राज्यात महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूकात महायुतीला पाशवी बहुमत मिळालेले आहे.या निकालाविषयी अनेक जण संशय घेत आहेत. त्यामुळे पुढील निवडणूका बॅलेटपेपरवर घ्याव्यात अशी मागणी बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

महायुतीचा विधानसभा निवडणूकांत पाशवी बहुमत मिळालेले आहे.अशा प्रकाराच्या धक्कादायक निकालांनी आता विरोधकांनी ईव्हीएमला विरोधक करीत ईव्हीएमला विरोध केला आहे. यावर यंदाचा कॉंग्रेसच्या दिग्गज उमेदवारांचा पराभव झालेला आहे. त्यात सलग आठ वेळा निवडून येणाऱ्या बाळासाहेब थारोत यांचा देखील पराभव झाला आहे. यावर बोलताना बाळासाहेब थोरात यांनी पुढील निवडणूका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी केली आहे. भाजपाला केवळ १५० जागांवर उमदेवार उभे करुन एवढे मोठे यश मिळत आहे, म्हणजे काही तरी गडबड असल्याचे बाळासाहेब थोरात यानी म्हटले आहे. या निकालानंतर सुजय विखे पाटील यांना अतिशय आनंद झाला आहे. याविषयी विचारता त्यांनी त्यांचा विजय झाला आहे. त्यामुळे ते आनंद करीत आहे. आम्ही आमचे काम करीत राहू येणारा काळच आता याबाबत योग्य ते उत्तर देईल असेही ते म्हणाले.

 

Published on: Nov 27, 2024 06:29 PM
एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेने एनडीएला ताकद, काय म्हणाले बावनकुळे
सच्चा शिवसैनिक कसा असतो ते एकनाथ शिंदे यांनी दाखवले, दीपक कसेरकर यांनी केले कौतूक