प्रकाश आंबेडकर मविआसोबत जाणार? बाळासाहेब थोरात म्हणतात…
एकीकडे वंचि्त बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांना संकेत दिले, तर दुसरीकडे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी महत्वाचं विधान केलं आहे. "वंचितच्या बाबतीत उद्धव ठाकरे चर्चा करत आहेत. चर्चा सकारात्मक झाली आणि ते बरोबर आले तर आम्हाला आनंदच आहे."
अहमदनगर : एकीकडे वंचि्त बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांना संकेत दिले, तर दुसरीकडे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी महत्वाचं विधान केलं आहे. “वंचितच्या बाबतीत उद्धव ठाकरे चर्चा करत आहेत. चर्चा सकारात्मक झाली आणि ते बरोबर आले तर आम्हाला आनंदच आहे”, असं विधान बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे. नवीन संसदेच्या उद्घाटनाबाबत बाळासाहेब थोरात यांनी नाराजी व्यक्त केली आहे. “राष्ट्रपती पद हे देशातील सर्वोच्च पद आहे. विशेष म्हणजे आदिवासी समाजातील महिला राष्ट्रपती देशाला लाभल्या, त्यामुळे नवीन संसद इमारतीच्या उद्घाटनाचा अधिकार राष्ट्रपतींचा आहे. दुर्दैवानं तसं होताना दिसत नाहीये याच देशाला वाईट वाटतंय.राष्ट्रपतींना अधिकार न देणे हा राज्यघटनेचा अपमान आहे”.
Published on: May 25, 2023 01:33 PM