मोठी बातमी : बाळासाहेब थोरात यांचा काँग्रेस विधीमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा, काँग्रेसमधील वाद विकोपाला

| Updated on: Feb 07, 2023 | 11:54 AM

बाळासाहेब थोरात यांचा काँग्रेस विधीमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. पाहा...

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यातील वाद आता विकोपाला गेलाय. बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस विधीमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिलाय. त्यामुळे काँग्रेसमधील वाद विकोपाला गेल्याचं स्पष्ट होतंय. विधान परिषदेची निवडणूक आणि सत्यजित तांबे यांच्या उमेदवारी यावरून झालेलं राजकारण यामुळे काँग्रेसचे काही नेते नाराज आहेत. बाळासाहेब थोरात यांनी आपली नाराजी बोलून दाखवली होती. तसं पत्र त्यांनी पक्षश्रेष्ठींना लिहिलं होतं. त्यानंतर आता बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस विधीमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे.

Published on: Feb 07, 2023 11:08 AM
लक्ष्मण जगताप यांच्याबद्दल सहानुभूती, पण निवडणूक आम्हीच जिंकणार- नाना काटे
राष्ट्रवादीने नाना काटे यांना उमेदवारी देताच राहुल कलाटे यांची नाराजी उघड, थेट अपक्ष लढण्याची तयारी