Balasaheb Thorat on Vikhe Patil | विखे पाटलांना फार कमी वेळ मिळालाय, त्यात त्यांनी चांगलं काम करावं

| Updated on: Aug 16, 2022 | 7:27 PM

राधाकृष्ण विखे पाटील यांना फार कमी काळासाठी महसूल मंत्रीपद मिळालं आहे. त्या काळात त्यांनी चांगलं काम करावं, असा टोला लगावला आहे.

अहमदनगर: राज्यात सत्तापालट झाल्यानंतर नगरच्या राजकारण पुन्हा पेटू लागले आहे. आता नवनिर्वाचित महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी ठाकरे सरकारच्या काळातील महसूल खात्यातील निर्णयांची चौकशी करण्याचे संकेत दिले होते. त्यावरून जोरदार राजकारण तापले आहे. या चौकशीच्या वक्तव्याचा समाचार घेताना बाळासाहेब थोरात यांनी, आमच्या कार्यकाळातील कामाची चौकशी करायची तर ती देखील करावी असे म्हटलं आहे. तसेच राधाकृष्ण विखे पाटील यांना फार कमी काळासाठी महसूल मंत्रीपद मिळालं आहे. त्या काळात त्यांनी चांगलं काम करावं, असा टोला लगावला आहे. ते अहमदनगरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते

Published on: Aug 16, 2022 06:14 PM
Vinayak Raut | वैभव नाईकांचा पराभव करण्यासाठी विरोधी उमेदवाराला उदय सामंतांनी 50 लाख दिले -TV9
Vinayak Mete : संशय कायम, अपघाताचे ठिकाण सांगितले जात नव्हते, मेटेंच्या पत्नींचे काय आहेत आरोप?