डॉ. तांबे पिता पुत्र यांच्यासाठी थोरात घेणार पुढाकार, म्हणाले रक्त थोडे गरम पण…

| Updated on: Feb 14, 2023 | 10:18 AM

नाशिक पदवीधर मतदारसंघात सत्यजित तांबे यांचा विजय झाला. ते अपक्ष म्हणून लढले असले तरी त्यांनी जे राजकारण केले ते विचारपूर्वक केले. डॉ. सुधीर तांबे आणि सत्यजित तांबे हे कॉंग्रेस विचारांचे आहेत.

संगमनेर : नाशिक पदवीधर मतदारसंघात सत्यजित तांबे यांचा विजय झाला. ते अपक्ष म्हणून लढले असले तरी त्यांनी जे राजकारण केले ते विचारपूर्वक केले. डॉ. सुधीर तांबे आणि सत्यजित तांबे हे कॉंग्रेस विचारांचे आहेत. त्यांना पक्षात परत आणण्यासाठी त्यांच्याशी बोलावे लागेल असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले. काँग्रेस हायकमांडसोबत चर्चा करून त्यानं परत आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. एखाद्या पक्षातही प्रमुख माणसे मिळाली ती कोणाला नको असतात पण त्यांचे रक्त काँग्रेसचे आहे. तो युवा काँग्रेसचा असल्यामुळे त्याचे रक्त थोडे गरम आहे. पण, ते परत येतील असा विश्वास असल्याचे थोरात यांनी सांगितले.

Published on: Feb 14, 2023 10:18 AM
संजय राऊत पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी जाणार
आधी तो निर्णय, मग मंत्रीमंडळ विस्तार, शिंदे गटाबाबत भाजपची सावध भूमिका