आमदारांच्या निधीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार : बाळासाहेब थोरात
हे निधी सुद्धा सर्वांचे थांबवले म्हणजे आणि फक्त सत्ताधाऱ्यांचे चालू असं करता येत नाही. याबाबत आम्ही सुद्धा त्यांच्याशी बोलणार आहोत. मंजूर झालेला निधी पूर्णपणे वितरीत करावा अशी मागणी आम्ही धरणार आहोत.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar )व बाळासाहेब थोरात मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत. आमदारांच्या निधीच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांची ते भेट घेणार आहेत. याबाबत बाळासाहेब थोरात(Balasaheb Thorat) हे मुख्यमंत्री यांची भेट घेणार आहे. आमदारांना मिळालेला निधीला व्हाईट बुक म्हणतात. एकदा व्हाईट बुकमध्ये आला कि तो निधी कायम होतो. मात्र आतापर्यंत असे निधी कधीही थांबवण्यात आलेले नव्हते . मात्र आता ते थांबवण्यात आले आहेत . याच्यामध्ये काही राजकारण करण्याचा काही कारण नसतं. हे निधी सुद्धा सर्वांचे थांबवले म्हणजे आणि फक्त सत्ताधाऱ्यांचे चालू असं करता येत नाही. याबाबत आम्ही सुद्धा त्यांच्याशी बोलणार आहोत. मंजूर झालेला निधी पूर्णपणे वितरीत करावा अशी मागणी आम्ही धरणार आहोत
Published on: Sep 13, 2022 02:11 PM