इर्शाळवाडी दुर्घटनेवर विधानसभेत चर्चा; बाळासाहेब थोरात म्हणाले, “विरोधी पक्षनेत्यांनाही सोबत…”

| Updated on: Jul 20, 2023 | 12:45 PM

रायगडमधील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावावर दरड कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत 10 जणांचे मृतृ झाला आहे. या दुर्घटनेवर आज विधानसभेत चर्चा झाली. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी अधिवेशनात यावर आपलं मत मांडलं.

मुंबई, 20 जुलै 2023 | रायगडमधील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावावर दरड कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत 10 जणांचे मृतृ झाला आहे. तर ढिगाऱ्याखालून 75 जणांना बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले आहे. बुधवारी रात्री 10.30 च्या सुमारास ही घटना घडली.  या दुर्घटनेवर आज विधिमंडळात चर्चा झाली. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी अधिवेशनात यावर आपलं मत मांडलं. थोरात म्हणाले की, “इर्शाळवाडीसारखी दुर्घटना घडते तेव्हा विरोधी पक्ष व सत्ताधारी पक्ष एकत्र काम करतो. महाराष्ट्राची ही चांगली परंपरा आहे. ही घटना घडली तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकाळीच तिकडे गेले. तसेच, काही मंत्रीही गेले. पण, अशावेळी विरोधी पक्षनेत्यांनाही सोबत न्यायला हवे होते. सभागृहात माहिती देण्याआधी सरकारने विरोधी नेत्यांशी चर्चा करायला हवी होती. आमच्यामध्येही असे अनेकजण आहेत, ज्यांना अशा दुर्घटना हाताळण्याचा अनुभव आहे. त्याचा सरकारला फायदा होईल.”

Published on: Jul 20, 2023 12:45 PM
इर्शाळवाडी दुर्घटना कशी, कधी घडली? देवेंद्र फडणवीस यांचं विधानसभेत निवेदन; सांगितला घटनाक्रम…
Raigad Irshalwadi Landslide | इर्शादवाडीवर कालची रात्र ठरली काळरात्र, एका रात्रीत होत्याचं नव्हतं झालं, पहा मन सून्न करणारा हा व्हिडिओ