VIDEO | पुण्यात देवदर्शनाला जाताय तर थांबा? ‘या’ मंदिरात आता थेट जाता येणार नाही? काय नियम केलेत?

| Updated on: May 27, 2023 | 3:38 PM

पुणे शहराच्या उपनगरातील वाघोली येथील वाघेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शनासाठी जाताना शॉर्ट कपड्यांवर बंदी घालण्यात आली आहे. महिलांना वन पीस, शॉर्ट स्कर्ट, शॉर्ट पॅन्ट घालून मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही.

पुणे : दिवसांपूर्वी तुळजाभवानी मंदिर हे ड्रेस कोड लागू केल्याने चर्चेत आले होते. त्यावरून विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी टीका केली होती. त्यानंतर या निर्णयावरून मंदिर संस्थानने यु टर्न घेतला होता. मात्र यानंतर आता अजित पवार यांच्याच जिल्ह्यात एका मंदिरात मंदिरात ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दिव्या खालीच अंधार अशी टीका केली जात आहे. पुणे शहराच्या उपनगरातील वाघोली येथील वाघेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शनासाठी जाताना शॉर्ट कपड्यांवर बंदी घालण्यात आली आहे. महिलांना वन पीस, शॉर्ट स्कर्ट, शॉर्ट पॅन्ट घालून मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. वाघेश्वर मंदिर हे पुरातन कालीन मंदीर आहे. येथे दर्शनासाठी भाविकांची गर्दी असते. मात्र शॉर्ट कपडे परिधान करून दर्शनासाठी येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. यामुळे पावित्र्य भंग पावत आहे. अन्य भविकांचीही तशी ट्रस्टकडे तक्रार आहे. मंदिराचे पावित्र्य राखले जावे यासाठी वाघोली विकास प्रतिष्ठाणचे अध्यक्ष सातव व उपाध्यक्ष दाभाडे यांनी हा निर्णय यांनी घेतला आहे. तसे फलक मंदिरात लावण्यात आले आहे. पुरुषांना देखील शॉर्ट पॅन्ट घालून मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. त्यानंतर आता या निर्णयाचे स्वागत वाघोलीतील नागरिकांनी व भाविकांनी केले.

Published on: May 27, 2023 03:25 PM
Maharashtra Politics : झिरवाळ यांनी साधला नार्वेकर यांच्यावर निशाना, म्हणाले, ”किती दिवस तपास केला तरी… फक्त”
“कॅबिनेट मंत्रिपदासाठी नितेश राणे आणि पडळकर यांच्यामध्ये स्पर्धा”, अमोल मिटकरी यांचा टोला