maharashtra politics | गणेश मंडळासमोर झळकले राजकीय बॅनर
मागच्या दोन वर्षात कोरोनामुळे कोणतेही सण साजरे करण्यात आले नाही. पण यंदा कोरोनाच्या निर्बंधामुक्त हा गणेशोत्सव होत आहे. त्यामुळे भाजपकडून लावण्यात आलेले हे बॅनर महाविकास आघाडिवर टीकास्त्र करणारे आहेत.
मुंबई : यंदा गणेशोत्सवाचा उत्साह हा द्विगुणित झालेला पाहायला मिळत आहे. कारण गेल्या 2 वर्षांपासून कोरोनाच सावट होतं, परंतु यंदा कोरोनाच्या निर्बंधातून मुक्त असा गणेशोत्सव होताना पाहायला मिळत आहे. पण या गणेशोत्सवात राजकीय बॅनरबाजी देखील पाहायला मिळत आहे. लालबाग येथील गणेश गल्लीच्या समोरच्या बाजूला भाजपकडून बॅनर लावण्यात आले आहे. त्या बॅनरवर आपले सरकार आले आणि हिंदू सणावरचे विघ्न टळले असा आशय छापण्यात आला आहे. मागच्या दोन वर्षात कोरोनामुळे कोणतेही सण साजरे करण्यात आले नाही. पण यंदा कोरोनाच्या निर्बंधामुक्त हा गणेशोत्सव होत आहे. त्यामुळे भाजपकडून लावण्यात आलेले हे बॅनर महाविकास आघाडिवर टीकास्त्र करणारे आहेत.