‘हीच ती वेळ, ठाकरे बंधू एकत्र या!’ मुंबईनंतर आता ठाण्यातही बॅनर

| Updated on: Jul 05, 2023 | 10:22 AM

सध्या राज्यात सुरु असलेल्या राजकीय नाट्यानंतर राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील का? अशी चर्चा सुरु झाली आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांनी एकत्र यावे यासाठी मनसे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्ते आवाहन करत आहे.

ठाणे : सध्या राज्यात सुरु असलेल्या राजकीय नाट्यानंतर राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील का? अशी चर्चा सुरु झाली आहे. मनसे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते तसं आवाहन करत आहे. यासाठी ठिकठिकाणी बॅनर्सही झळकले आहेत. आता मुंबई नंतर ठाण्यामध्ये मंगळवारी या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन दोन्ही ठाकरे एकत्र यावे यासाठी बॅनर बसविले आहेत. हे फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या बॅनरच्या मध्यभागी बाळासाहेब आणि दोन्ही बाजूला उद्धव आणि राज ठाकरे यांचे फोटो आहे.‘महाराष्ट्राला तुमची गरज आहे, बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्याची हीच वेळ आहे… आम्हाला महाराष्ट्रात फक्त ‘ठाकरे सरकार’ हवे आहे…. साहेब एकत्र या.. असे बॅनरवर लिहिले आहे.

Published on: Jul 05, 2023 10:22 AM
शिवसेना भवनानंतर आता येथेही लागले मनसेचे बॅनर्स, उद्धव-राज ठाकरे एकत्र येण्याची मागणी
अमोल कोल्हे यांनी राजीनामा दिला?, शरद पवार यांच्यासोबत बंद दाराआड काय चर्चा झाली? पाहा व्हिडीओ…