श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात ठाकरे गटाची बॅनरबाजी

| Updated on: Jun 01, 2023 | 12:56 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभेत ठाकरे गटाने बॅनरबाजी केली आहे. माजी आमदार सुभाष भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात पदाधिकाऱ्यांकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. तसेच बॅनरवर भोईर यांचा भावी खासदार असा उल्लेख करण्यात आला आहे.

ठाणे : लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. जागावाटपवारून मविआ आणि शिवसेना-भाजप युतीत अनेक दावे-प्रतिदावे केले जात आहेत.  याच पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांची डोकेदु:खी वाढण्याची शक्यता आहे.  त्यांच्या मतदारसंघात ठाकरे गटाने बॅनरबाजी केली आहे. माजी आमदार सुभाष भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात पदाधिकाऱ्यांकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. तसेच बॅनरवर भोईर यांचा भावी खासदार असा उल्लेख करण्यात आला आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभेतून भाजप कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांना लोकसभेसाठी उतरवण्यास प्रयत्नशील आहे. तर शिवसेनेला आणि भाजपला मात देण्यासाठी ठाकरे गटाने कंबर कसल्याची चर्चा राजकीय क्षेत्रात रंगू लागली आहे.

Published on: Jun 01, 2023 12:56 PM
खर्च कोटीत, हातात मात्र काहीच नाही; ‘या’ जिल्ह्यातील 170 गावांमध्ये पाणीटंचाइचे सावट
कांदा, कापूस, टोमॅटोनंतर आता दुधाने आणलं शेतकऱ्यांना संकंटात? शेतकऱ्यांनी केला चक्काजाम