वर्धापन दिनावरून ‘मातोश्री’ बाहेर लागले एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरेंचे बॅनर
दसरा मेळाव्यानंतर आता मुंबईत दोन शिवसेना वर्धापन दिन सोहळे पाहायला मिळणार आहेत. यासाठी दोन्ही गट कामाला लागले आहेत. 19 जून रोजी शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा केला जातो. शिवसेना फुटीनंतर आता मुंबईत दोन वर्धापन सोहळे पाहायला मिळणार आहे.
मुंबई : दसरा मेळाव्यानंतर आता मुंबईत दोन शिवसेना वर्धापन दिन सोहळे पाहायला मिळणार आहेत. यासाठी दोन्ही गट कामाला लागले आहेत. 19 जून रोजी शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा केला जातो. शिवसेना फुटीनंतर आता मुंबईत दोन वर्धापन सोहळे पाहायला मिळणार आहे. या सोहळ्यासाठी आज मातोश्रीच्या परिसरात पुन्हा एकदा शिंदे आणि ठाकरे गटांमध्ये बॅनरवॉर पाहायला मिळालं. बाळासाहेबांचे विचाराचे आम्हीच खरे वारसदार अशा आशयाचा बॅनर शिंदे गटाकडून लावण्यात आला आहे. मातोश्रीच्या रस्त्यासमोर आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या बॅनरच्या अगदी बाजूलाच किरण पावसकर यांनी बॅनर लावला आहे.
Published on: Jun 12, 2023 11:43 AM