शिंदे गटाच्या मेळाव्याआधी डोंबिवलीत बॅनरबाजी; …म्हणून मनसेने लावले बॅनर

| Updated on: Sep 23, 2022 | 8:45 AM

शिंदे गटाच्या मेळाव्याआधी डोंबिवलीत मनसेकडून जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. 'कोणी मुहूर्त देतं का मुहूर्त' अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहेत.

मुंबई :  रखडलेल्या रस्त्यांच्या कामावरून मनसे चांगलीच आक्रमक झाली आहे. शिंदे गटाच्या मेळाव्याआधी डोंबिवलीत मनसेकडून जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. वर्क ऑर्डर होऊन दोन महिने उलटले तरी कामाला सुरुवात झालेली नाही. या पार्श्वभूमीवर मनसेच्या वतीने ‘कोणी मुहूर्त देतं का मुहूर्त’ अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहेत. मनसेने बॅनरच्या माध्यमातून प्रशासनाला धारेवर धरल्याचं पहायला मिळत आहे. वर्क ऑर्डर होऊन दोन महिने उलटले तरीही अद्याप डोंबिवली एमआयडीसी परिसरातील कामे प्रलंबित आहेत. कामे कधी निवडणुकांच्या तोडांवर करणार का? असा सवाल मनसेचे आमदार राजू पाटील यांनी उपस्थित केला आहे.

 

 

 

Published on: Sep 23, 2022 08:45 AM
भीषण! मुंबई-गोवा महामार्ग 12 पेक्षा जास्त तास उलटले तरी ठप्पच, LPG टँकरमधून गॅस गळतीचा धोका
गुजरातमधील ड्रग्ज तस्करीचा पैसा कुठे जातो? ‘सामना’मधून भाजपाला पुन्हा खोचक सवाल