सेना भवनासमोर संभाजीराजेंच्या समर्थकांची बॅनरबाजी
राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाल्यानंतर शिवसेना भवनासमोर संभाजीराजेंच्या समर्थकांकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. छत्रपतींच्या अपमानाचा बदला घेणाऱ्या आमदारांचे आभार असा मजकूर या बॅनरवर छापण्यात आला आहे.
राज्यसभा निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत. या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाला आहे तर भाजपाचे धनंजय महाडिक हे विजयी झाले आहेत. दरम्यान संभाजीराजे छत्रपती हे राज्यसभा निवडणूक लढवण्यास इच्छूक होते. त्याकरता शिवसेनेने आपल्याला पाठिंबा द्यावा असे संभाजी राजे यांनी म्हटले होते. मात्र शिवसेनेकडून संजय पवार यांना उमेदवारी देण्यात आली. पवार यांचा या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर शिवसेना भवनासमोर संभाजीराजेंच्या समर्थकांकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. छत्रपतींच्या अपमानाचा बदला घेणाऱ्या आमदारांचे आभार असा मजकूर या बॅनरवर छापण्यात आला आहे.
Published on: Jun 12, 2022 10:02 AM