गणपतीपुळे मंदिर परिसरात भाविकांकडून बाप्पाचा जयघोष
अंगारकी (Angarki) निमित्त गणपतीपुळे येते देखील पहाटेपासून भाविकांची गर्दी झाली आहे. यावेळी कोणतेही नियम नसल्यामुळे भाविकांमध्ये समाधान दिसून येत आहे.
अंगारकी (Angarki) निमित्त गणपतीपुळे येते देखील पहाटेपासून भाविकांची गर्दी झाली आहे. यावेळी कोणतेही नियम नसल्यामुळे भाविकांमध्ये समाधान दिसून येत आहे. बाप्पाच्या नावाचा जयघोष करत भाविक बाप्पा चरणी लिन होताना दिसत आहेत. राज्याच्या कानकोपऱ्यातून भाविक सध्या गणपतीपुळे याठिकाणी दाखल झाले आहेत. जवळपास लाखभर भाविक अंगारकीनिमित्त गणपतीपुळे(Ganpatipule) येते दाखल होतात. पण यावर्षी मात्र तुलनेने गर्दी कमी आहे. एसटीच्या कमी फेऱ्या ज सलग चार दिवस झालेल्या सुट्ट्या आणि गावोगावी सुरु असलेल्या यात्रा यामुळे अंगारकीला गणपतीपुलेला येणाऱ्या भाविकांची संख्या किमान 30 ते 40 हजारणे घटल्याचा अंदाज स्थानिक वर्तवतात. पण पहाटे तीन वाजल्यापासून दर्शन रांगांमधून भाविक दर्शनासाठी येत आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक गणपतीपुळ्यात दाखल झालेत. 2022 मध्ये अंगारकी चतुर्थी दोन वेळा येणार आहे. त्यातील ही पहिली अंगारकी आहे.