बारामतीत दादांच्या कार्यकर्त्यांची धमकी ? काय म्हणाल्या शर्मिला पवार

| Updated on: Nov 20, 2024 | 2:50 PM

बारामतीत विधानसभेचे मतदान सुरु असताना पवार विरुद्ध पवार असा सामना असताना राडा झाला आहे. आपल्या कार्यकर्त्याला पोलिंग एजंटने धमकी दिल्याचा आरोप युगेंद्र पवार यांची आई शर्मिला पवार यांनी केला आहे. त्यावर असेही काही झाले नसल्याचे अजितदादा पवार यांनी म्हटले आहे.

बारामती विधानसभा निवडणूकीकडे साऱ्या देशाचे लक्ष लागले आहे.राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अजित पवार विरुद्ध त्यांचे पुतणे युगेंद्र पवार ( शरद पवार गट ) असा पवार विरुद्ध पवार असा घरातच सामना आहे. विधानसभा निवडणूकीचे मतदान सुरु असताना युगेंद्र पवार यांची आई शर्मिला पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना पोलिंग एजंटकडून धमकी दिली असल्याचा आरोप केलेला आहे. शर्मिला पवार यांनी आपला कार्यकर्ता मोहसीन हा रडत होता. त्यामुळे आपण तेथे गेलो. त्या पुढे म्हणाल्या की, ‘माझ्यासमोर दमदाटी केली. माझ्यासमोर ती व्यक्ती होती. मतदान केंद्राच्या आत स्वत:च्या घरातलं लग्न कार्य असल्यासारखं, या, बसा मतदान केलं का? अशी विचारणा सुरु होती. बोट दाखवून  खाण खुणा केल्या जात होत्या असा आरोप शर्मिला पवार यांनी केला आहे. बोटाने संकेत केले जात होते, दबाव आणले जात होते असा आरोप शर्मिला पवार यांनी केला. यावर अजित पवार यांनी असे काही घडलेले नाही. सीसीटीव्ही पाहा हवे तर. माझे कार्यकर्ते असे वागू शकत नाही असा बचाव केला आहे.

Published on: Nov 20, 2024 01:51 PM
बारामतीत राडा, युगेंद्र पवारांची आई मतदानकेंद्रावर; अजितदादा गटाच्या कार्यकर्त्यांवर भडकल्या, कारण काय?
‘त्या’ ऑडिओ क्लीपमधील आवाज सुप्रिया आणि पटोले यांचा, अजितदादांचा आरोप