मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाल्याचा राजेंद्र राऊत यांचा दावा

| Updated on: Sep 07, 2024 | 2:14 PM

सोलापूरच्या बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात वादग्रस्त विधान केले आहे.

बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. ते म्हणाले की मी जर फुंकलो असतो तरी राजे ( उदयन राजे ) पडले असते.मी राजाचे वंशज म्हणून जाऊन दिले असे ( जरांगे पाटील ) दादांनी माझ्या समोर विधान केलेले आहे असे बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी म्हटले आहे. मी आईची शपथ घेऊन सांगतोय खोटं बोलणार नाही असेही आमदार राजेंद्र राऊत यांनी म्हटले आहे. यापूर्वी देखील जरांगे पाटील यांच्या विरोधात त्यांच्या एकेकाळच्या सहकाऱ्यांनी त्यांना बदनाम करणारी विधाने केलेली आहेत. अजय बारस्कर महाराज आणि एका महिला सहकाऱ्यांनी जरांगे पाटील यांच्या विरोधात वादग्रस्त विधाने केलेली आहेत.  मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळवून देण्याच्या जरांगे पाटील यांच्या मागणीला आमचा पाठींबा आहे असे  महाविकास आघाडीच्या एका तरी नेत्याने म्हणून दाखवावे असे चॅलेज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच दिले आहे. मनोज जरांगे केवळ मला टार्गेट करीत आले आहेत असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

 

Published on: Sep 07, 2024 02:09 PM
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे येऊ नयेत, अमृता फडणवीस यांचा कोणाला टोला
यंदाचा कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?