मेंदू हॅक होत असेल तर राजकारणात कधीच नेतृत्व करू नये; भाजप नेत्याची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका
यावेळी बारसूमध्ये प्रकल्प झाला तर फायदा होईल असं मला गद्दारांनी सांगितलं होतं. असा घणाघात बारसू प्रकल्पावरून ठाकरेंनी शिंदे गटावर आणि मंत्री उदय सामंत याचं नाव न घेता केला कालच्या सभेत केला होता.
रत्नागिरी : बारसू रिफायनरीवरून कोकणासह राज्यातील राजकारण तापले आहेत. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज कोकण दौऱ्यावर आहे. यावेळी बारसूमध्ये प्रकल्प झाला तर फायदा होईल असं मला गद्दारांनी सांगितलं होतं. असा घणाघात बारसू प्रकल्पावरून ठाकरेंनी शिंदे गटावर आणि मंत्री उदय सामंत याचं नाव न घेता केला कालच्या सभेत केला होता. त्यावर आता भाजप नेते आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री पदावर असणाऱ्या व्यक्तींना आपली सदसदविवेक बुद्धी वापरली पाहिजे. दुसऱ्याने सांगितल्यामुळे त्यांचा मेंदू हॅक होत असेल तर त्या व्यक्तीनं राजकारणात कधीच नेतृत्व करू नये. बारसु प्रकल्प व्हावा म्हणून त्यावेळेस त्यांनी पत्र दिलं. आता मात्र सत्तेतून बाहेर पडल्यावर मात्र उपरती सुचली म्हणत आहात असा टोला लगावला आहे.