100 खोके मातोश्रीकडे; नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर काय केला आरोप?
ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर टीका केली. त्याच टीकेला आता भाजप नेते नितेश राणे यांनी उत्तर दिलं आहे. यावेळी त्यांनी ठाकरे यांना दलाल म्हणत टीका केली.
रत्नागिरी : बारसू रिफायनरीवरून कोकणासह राज्यातील राजकारण तापले आहेत. ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे आज कोकण दौऱ्यावर आहे. तर, भाजपचा रिफायनरी समर्थनार्थ मोर्चा आहे. मात्र मनाईबंदी आदेश लागू केल्याने ठाकरे आणि भाजपचे हे कार्यक्रम होणार नाहीत. त्यामुळे ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर टीका केली. त्याच टीकेला आता भाजप नेते नितेश राणे यांनी उत्तर दिलं आहे. यावेळी त्यांनी ठाकरे यांना दलाल म्हणत टीका केली. तर यावेळी त्यांनी ठाकरे हे मुख्यमंत्री असताना लिहिलेल्या पत्राचा उल्लेख केला आहे. ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी बारसूत रिफायनरी झाली पाहिजे असे पत्र लिहलं होतं. त्यावरून राणे यांनी निशाना साधत तेंव्हा समर्थनार्थ पत्र काढलं आणि आता विरोधी पक्षात असताना रिफायनरीला विरोध करण्याचं धंदा सुरू आहे. हा नेमका विचार कसा बदलला, हा विचार कोकणाच्या जनतेसाठी बदलला नाही, पण खिशात पैसे आले पाहिजेत, मातोश्रीवर खोके पोहोचले पाहिजेत याकरता विचार बदलला असा घणाघात केला आहे. तर तेव्हाचे सरकार म्हणून केंद्र सरकारकडे जे पत्र पोहोचवलं होतं त्या एका पत्राची किंमत 100 कोटी होती. ते 100 खोके मातोश्रीकडे पोहोचले पाहिजेत म्हणून पत्र व्यवहार केला होता.