बाहेरची लोकं म्हणजे कोण हे आधी दलालांनी आमच्याकडून जाणून घ्यावं, राऊत यांचा शिंदे गटाच्या दोन मंत्र्यांवर पलटवार

| Updated on: Apr 29, 2023 | 1:10 PM

त्यांनी बारबाहेरचे लोकं म्हणजे कोण? कोठून आले? मॉरिशसमधून पाठवलेत का? पाकिस्तान, बांगलादेशमधून आले की? सुदान मधून असा सवाल केला आहे. तर हे आंदोलक बारसूचेच आहेत.

मुंबई : राजापूर तालुक्यातील बारसू गावात रिफायनरी (Barsu Refinery) प्रकल्प होऊ नये, यासाठी बारसू गावातील लोकांनी आंदोलन करण्यात येत आहे. हे आंदोलन आज चिघळले असून त्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि ठाकरे गट आमने – सामने आला आहे. बारसू आंदोलनात जे आंदोलक आहेत, ते कोल्हापुरातून आले असल्याचा दावा उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी केला होता. त्यापाठोपाठ बारसूत स्कार्फ घालून काही लोक घुसले होते. ते कोण आहेत? याचा तपास केला पाहिजे, असे म्हणत अप्रत्यक्ष आरोप मंत्री दीपक केसरकर यांनी केला. त्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay raut) यांनी सामंत यांच्यासह केसरकर यांना फैलावर घेतलं आहे. त्यांनी बारबाहेरचे लोकं म्हणजे कोण? कोठून आले? मॉरिशसमधून पाठवलेत का? पाकिस्तान, बांगलादेशमधून आले की? सुदान मधून असा सवाल केला आहे. तर हे आंदोलक बारसूचेच आहेत. जे मुंबई आणि इतर ठिकाणी कामाला आहेत. ते आपल्या गावाला वाचवायला गेले. कोकणातील 70% तरुण मुलं ही बाहेर कामानिमित्त आहेत. त्यामुळे आधी बाहेरची कोणाला म्हणतात हे समजून घ्या. आणि माहितच नसेल तर इस्लामिक ऑइल रिफायनरीच्या दलालांनी आमच्याकडून माहिती घ्या असा टोला लगावला आहे.

Published on: Apr 29, 2023 01:10 PM
मुख्यमंत्री म्हणतात मी नाही, मग मॉरिशसमधून आदेश आला का? राऊतांचा निशाना फडणवीस यांच्यावर निशाना
रिफायनरीसाठी माती सर्वेक्षण, बघा ‘tv9 मराठी’चा बारसूतून थेट आढावा