रिफायनरीसाठी ‘हे’ यांचं हिंदुत्व; मराठी माणसावर हल्ले… राऊत यांची सरकारवर काय टीका

| Updated on: Apr 29, 2023 | 12:17 PM

बारसूत लाठीमार झालाच नसल्याचं रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं आहे. आणि तेच स्टेडमेंट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांना दिलं.

मुंबई : बारसूमध्ये रिफायनरीचा विरोध सुरूच आहे. काल सर्वेक्षणाला ग्रामस्थांनी विरोध केला. त्याच्यांवर लाठीचार्ज करत अश्रुधुराच्या नळकांडया फोडण्यात आल्या. त्यावर तीव्र पडसाद उमटत असतानाच बारसूत लाठीमार झालाच नसल्याचं रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं आहे. आणि तेच स्टेडमेंट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांना दिलं. त्यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आक्रमक झाले आहेत. तसेच त्यांनी हिंदुत्ववादी सरकार इस्लामिक ऑईल रिफायनरीसाठी मराठी माणसावर हल्ला करतंय, असा गंभर आरोपही राऊत यांनी केला. राऊत यांनी, सौदी अरेबेयिताली ऑयल रिफायनरी ही एक कंपनी आहे. ज्यासाठी रत्नागिरीतील मराठी माणसावर हे हिंदुत्ववादी सरकार हल्ले करत आहे. एका इस्लामिक ऑयल रिफायनरीसाठी हे यांचं हिंदुत्व, अशी टीकाही राऊत यांनी केली आहे.

Published on: Apr 29, 2023 12:17 PM
बारसू रिफायनरीवरून मुख्यमंत्र्यांची डोळेझाक; राऊत यांची शिंदेवर टीका, काय केली मागणी?
वादळं, गारा अन् अवकाळीचा हाहाकार, शेतपिकांसह फळबागांचं मोठं नुकसान; दोघांचा मृत्यू