कोकणातील जनतेला रोजगार मिळत असताना असं राजकारण, इतकं दुर्दैवी काहीही नाही; शिवसेना मंत्र्याचा ठाकरेंवर पलटवार

| Updated on: Apr 29, 2023 | 4:15 PM

ज्यावेळी 2 लाख मुलांना रोजगार देणारा कारखाना कोकणात येतो त्यावेळी राजकारण करायचं हे दुर्दैवाची बाब असल्याचे म्हटलं आहे. आता फक्त मतांसाठी लोकांची दिशाभूल करण्यासाठी, पोलिसांची आणि महाराष्ट्राची बदनामी करण्यासाठी हे सुरू आहे.

बदलापूर : राजापूर तालुक्यातील बारसू गावात रिफायनरी (Barsu Refinery) प्रकल्प होऊ नये, यासाठी बारसू गावातील लोकांनी आंदोलन करत आहेत. हे आंदोलन चिघळले. यावरून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे. त्या टीकेवर आता शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी पलवार करताना ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी, केवळ दुसऱ्यांवर खोटे आरोप करायचे, कारखाने बाहेर गेले असं म्हणायचं. ज्यावेळी 2 लाख मुलांना रोजगार देणारा कारखाना कोकणात येतो त्यावेळी राजकारण करायचं हे दुर्दैवाची बाब असल्याचे म्हटलं आहे. आता फक्त मतांसाठी लोकांची दिशाभूल करण्यासाठी, पोलिसांची आणि महाराष्ट्राची बदनामी करण्यासाठी हे सुरू आहे. हे सगळं कोणी शिकवलं असा सवाल आदित्य ठाकरे यांना केला आहे. तर आमच्या वेगळ्या अपेक्षा या नेतृत्वाकडून होत्या. आमच्यावर अन्याय झाला तो झाला. त्यावेळी तुम्ही डोळ्याला पट्टी बांधली होती असा घणाघात उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे. तर कोकणातील जनतेला ज्यावेळी रोजगार मिळतोय त्यावेळी मतांचे राजकारण करणे इतका दुर्दैव काहीही नसल्याची टीका त्यांनी केली आहे.

Published on: Apr 29, 2023 04:15 PM
5-50 झाडं वाचवली, पारितोषिक मिळवली; त्याच्यापेक्षा जनतेकडं बघितलं असतं तर…; आदित्य ठाकरेंवर कोणाची टीका
गुलाल, विजयाचा जल्लोष आणि धनंजय मुंडे यांच्या मातोश्रींना अश्रू अनावर