चालायची ताकद नसणाऱ्यांनी पळायची भाषा करू नये; नारायण राणे यांची ठाकरे, राऊतांवर टीका
ठाकरे यांनी वीज निर्मितीचे प्रकल्प कोकणात होऊ नयेत 34 उद्योजकांकडून 5 कोटी ॲडव्हान्स घेतले. तर 500 कोटी रुपयेचा व्यवहार केला असा आरोप केला आहे. फक्त पैसा कमवायचं आणि दुसऱ्यांना खोके चिडवायचं हेच काम ठाकरे करतात.
मुंबई : राजापूर तालुक्यातील बारसू गावात रिफायनरी (Barsu Refinery) प्रकल्प होऊ नये, यासाठी बारसू गावातील लोकांनी आंदोलन करण्यात येत आहे. हे आंदोलन आज चिघळले आहे. यावरून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), खासदार संजय राऊत आणि खासदार विनायक राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे. तर आपण कोकणात जाणार असल्याचे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी म्हटलं आहे. त्यावरून भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी टीका केली आहे. त्यांनी कोकणातून मुंबईत जायला किती किलोमीटर पळावं लागेल हे बघा. तर चालायची ताकद नसणाऱ्यांनी पळायची भाषा करू नये असा घणाघात केला आहे. याबरोबरच राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सेटलमेंट केल्याचा आरोप केला आहे. ठाकरे यांनी वीज निर्मितीचे प्रकल्प कोकणात होऊ नयेत 34 उद्योजकांकडून 5 कोटी ॲडव्हान्स घेतले. तर 500 कोटी रुपयेचा व्यवहार केला असा आरोप केला आहे. फक्त पैसा कमवायचं आणि दुसऱ्यांना खोके चिडवायचं हेच काम ठाकरे करतात. तर ठाकरे यांना पॉलिटिकली डोकं नाही. बाळासाहेबांच्या नखकांचीही सर नसल्याची टीका केली आहे. तर कोकणात येताय तर या आम्ही आहोत, बघू असा इशारा दिला आहे.