एकही पाऊल मागे घेतलं जात नाहीये, हे सरकार पडेल?; ठाकरेंचा दावा

| Updated on: May 06, 2023 | 3:00 PM

मात्र आता प्रकल्प आणा किंवा आणू नका या सरकारच्या खुर्चीचे पाय मला डगमगताना दिसत आहेत असं म्हणत बारसू प्रकल्पावरून उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे सरकार आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे.

रत्नागिरी : बारसू रिफायनरीवरून कोकणासह राज्यातील राजकारण तापले आहेत. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज कोकण दौऱ्यावर आहे. यावेळी बारसूमध्ये प्रकल्प झाला तर फायदा होईल असं मला गद्दारांनी सांगितलं होतं. मात्र आता प्रकल्प आणा किंवा आणू नका या सरकारच्या खुर्चीचे पाय मला डगमगताना दिसत आहेत असं म्हणत बारसू प्रकल्पावरून उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे सरकार आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे. या सरकारच्या खुर्चीचे पाय डगमगताना दिसत आहेत. मी प्रकल्पाला विरोध करण्याची भूमिका घेतली असली तरीही सरकार एकही पाऊल मागे घेतलं जात नाहीये. पण त्यांच्या खुर्चीचे पाय डगमगत आहेत. हे सरकार पडेल असं आपल्याला वाटतं असेही ठाकरे म्हणाले. तर फक्त नकारघंटा असती तर समृद्धी महामार्ग झाला नसता असेही ठाकरे म्हणाले.

Published on: May 06, 2023 03:00 PM
भाजप नेत्याची उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका; म्हणाले, ‘ठाकरेंना आम्ही…’
उद्धव ठाकरे यांच्या बारसू दौऱ्याचं दीपक केसरकर यांनी थेट सांगितलं कारण; म्हणाले, ‘विकासात अडथळा…’