बारसूत रिफायनरीवरून वाद सुरू असतानाच राष्ट्रवादी नेत्याचा सवाल, उद्योग यावेत की नको….
बारसूमधील लोकांना रिफायनरी नको असेल तर इथे रिफायनरी होता कामा नये, जर हुकूमशाहीने हा प्रकल्प लादण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्र पेटवू, अशी घणाघाती टीका करत ठाकरे यांनी शिंदे सरकारला इशारा दिला.
मुंबई : बारसूतील प्रस्तावित रिफायनरीवरून मोठा वाद सुरू आहे. या प्रकल्पाला स्थानिकांनी कडाडून विरोध केला आहे. याविरोधात स्थानिक ग्रामस्थ आंदोलनही करत आहेत. त्यादरम्यान आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजापूरमध्ये जात येथील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीकास्र सोडलं. बारसूमधील लोकांना रिफायनरी नको असेल तर इथे रिफायनरी होता कामा नये, जर हुकूमशाहीने हा प्रकल्प लादण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्र पेटवू, अशी घणाघाती टीका करत ठाकरे यांनी शिंदे सरकारला इशारा दिला. त्यावरून भाजप नेते नितेश राणे यांनी देखिल पलवार केला आहे. बारसूत रिफायनरीवरून वाद सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी सरकारला सल्ला दिला आहे. त्यांनी बारसूत रिफायनरी जबरदस्तीने लादण्याची गरज नाही असं म्हटलं आहे. तर लोकांच्या भावना जाणून घेऊन प्रकल्प करा अशी सरकारवर टीका केली आहे. त्याचबरोबर कोकणात कायम उद्योग येत नाही अशी ओरड होत असते. आणि फॉस्कॉन सारखे उद्योग बाहेर जातात. त्यामुळे उद्योग यावेत की न यावेत याचा विचार व्हायला हवा. तर जसा जामनगरला मोठी इंडस्ट्री आहे. त्याच तोलामोलाचा हा प्रकल्प असल्याचं भुजबळ यांनी म्हटलं आहे.