उद्धव ठाकरे हे सर्वात मोठे दलाल; त्यामुळेच ते स्वतःच्या घराची चूल पेटवण्यासाठी… ; नितेश राणेंची टीका
पंतप्रधान मोदी मनकी बात करतात तर उद्धव ठाकरेंना केवळ धन की बात समजते. कोकणात ते कोकणवासियांसाठी नव्हे तर स्वतःच्या घराची चूल पेटवण्यासाठी आले आहेत.
रत्नागिरी : बारसू रिफानरीला विरोध करणाऱ्या आंदोलकांची आज ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली. या भेटीत संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. तसेच जर हुकूमशाही पद्धतीनं प्रकल्प लादणार असाल तर महाराष्ट्र पेटवून टाकू असा इशारा उद्धव ठाकरे यांनी यावेळी सरकारला दिला आहे. ठाकरेंच्या याच इशाऱ्याला भाजप नेते नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी, पंतप्रधान मोदी मनकी बात करतात तर उद्धव ठाकरेंना केवळ धन की बात समजते. कोकणात ते कोकणवासियांसाठी नव्हे तर स्वतःच्या घराची चूल पेटवण्यासाठी आले आहेत. उद्धव ठाकरे हे सर्वात मोठे दलाल आहेत, अशाप्रकारची सणसणीत टीका नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बारसूमध्ये रिफायनरी झाली पाहिजे असे समर्थनार्थ पत्र काढलं. त्यानंतर आता विरोधी पक्षात असताना या ग्रीन रिफायनरीला विरोध करण्याचे सुचतंय. हा विचार नेमका कसा बदलला? हा विचार कोकणातील जनतेसाठी बदलेला नाही तर, खिशात पैसे येण्यासाठी आणि मातोश्रीवर खोके पोहोचण्यासाठी आले पाहिजे, असेही नितेश राणे म्हणाले.