काल ताकदीनं उतरू आणि आज शिंदे गटाला सोबत घेऊ, चंद्रशेखर बावनकुळे यांच एका दिवसात घुमजाव
लोकसभेच्या 48 जागांसाठी भाजप जोरदार प्रयत्न करेल पण शिंदे गटासोबत युती करूनच लढणार आहोत, असं बावनकुळे यांनी सांगितलं. तर शिंदे गटाचा उमेदवार ज्या ठिकाणी उभा असेल तेथे आम्ही जास्त ताकद लावू, युतीचा उमेदवार विजयी करू, असं आश्वासनही बावनकुळे यांनी दिलंय.
मुंबई : काल चंद्रपुरमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी आगामी लोकसभा, विधानसभा तसेच महापालिका निवडणुका ताकतीने लढवण्यासाठी तयार रहा असे म्हटलं होतं. तर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखिल अध्यक्षांनी तसच सांगितल्याचं सांगितलं होतं. तर लोकसभा निवडणुकीत भाजपला राज्यातील 45 जागा मिळणारच, अशी घोषणाच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे केली होती. त्यामुळे शिंदे गटाचं टेन्शन वाढलं होतं
यानंतर शिंदे गटाचे आमदार आणि खासदार आता काय करणार असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला होता. यानंतर आज भाजपच्या या अजेंड्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रश्नाचं स्पष्ट उत्तर दिलं.
तसेच लोकसभेच्या 48 जागांसाठी भाजप जोरदार प्रयत्न करेल पण शिंदे गटासोबत युती करूनच लढणार आहोत, असं बावनकुळे यांनी सांगितलं. तर शिंदे गटाचा उमेदवार ज्या ठिकाणी उभा असेल तेथे आम्ही जास्त ताकद लावू, युतीचा उमेदवार विजयी करू, असं आश्वासनही बावनकुळे यांनी दिलंय.