‘त्या’ ४० आमदारांच्या डोक्यात का येतो तो विषय ? बच्चू कडू यांनी सांगितले ‘हे’ मोठे कारण
आगामी निवडणुकीत प्रहार संघटना १० ते १५ जागा लढविणार आहे. भाजप - शिंदे गटाने आम्हाला सोबत घेण्यासाठी आग्रह करू. त्यांनी सोबत घेतले तर सोन्याहून पिवळे असेल नाही तर आम्ही स्वतंत्र लढू असे प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू म्हणाले आहेत.
नागपूर : आगामी निवडणुकीत प्रहार संघटना १० ते १५ जागा लढविणार आहे. भाजप – शिंदे गटाने आम्हाला सोबत घेण्यासाठी आग्रह करू. त्यांनी सोबत घेतले तर सोन्याहून पिवळे असेल नाही तर आम्ही स्वतंत्र लढू असे प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू म्हणाले आहेत. कोर्टात आणि निवडणूक आयोगासमोर जे प्रकरण सुरु आहे ते पाहता विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. मंत्रीमंडळाच्या विस्तारात काहींना घेतले आणि काहींना नाही तर भूकंप होईल अशी स्थिती नाही. भाजप आणि शिंदे गट हे दोन्ही पक्ष मजबुतीने उभे आहेत. त्यामुळे विस्तार झाला तरी कुणी बाहेर जाईल अशी स्थिती नाही. उलट इकडे आणखी आमदार येण्याची जास्त शक्यता आहे. मंत्रिमंडळ विस्तारावरून विरोधी पक्षसारखी विचारणा करत आहे. पण, आमच्यातही चर्चा होते. ४० जण रांगेत आहेत त्यांचे अर्धे डोके त्याच्यातच असते, असा टोलाही त्यांनी लगावला.