Video : बंदी असतानाही बीडमध्ये रेड्यांच्या टक्करीचे आयोजन, एक रेडा जखमी

| Updated on: Apr 11, 2022 | 5:46 PM

प्राण्यांच्या झुंज (Collision of animals) आणि टक्करीसारख्या जीवघेण्या स्पर्धेवर राज्यात बंदी आहे. मात्र बीडमध्ये मोठ्या जल्लोषात रेड्यांच्या टक्करीचे थाटामाटात आयोजन करण्यात आले होते. रामनवमीनिमित्त बीडच्या (Beed) वायबट्टवाडी (Waybattwadi) गावात ग्रामस्थांनी या टक्करींचे आयोजन केले होते. संपूर्ण राज्यभरातून रेडे या स्पर्धेत भाग घेण्यासाठी आणले गेले होते. मागील काही दिवसांपूर्वी कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातही बैलांच्या टक्करींचे आयोजन केले गेले होते, […]

प्राण्यांच्या झुंज (Collision of animals) आणि टक्करीसारख्या जीवघेण्या स्पर्धेवर राज्यात बंदी आहे. मात्र बीडमध्ये मोठ्या जल्लोषात रेड्यांच्या टक्करीचे थाटामाटात आयोजन करण्यात आले होते. रामनवमीनिमित्त बीडच्या (Beed) वायबट्टवाडी (Waybattwadi) गावात ग्रामस्थांनी या टक्करींचे आयोजन केले होते. संपूर्ण राज्यभरातून रेडे या स्पर्धेत भाग घेण्यासाठी आणले गेले होते. मागील काही दिवसांपूर्वी कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातही बैलांच्या टक्करींचे आयोजन केले गेले होते, त्यावेळीही सिंधुदुर्ग पोलिसात आयोजकांविरोधात गुन्हा दाखल केला गेला होता. कोकणातील झुंज लावण्यात आल्यानंतर याप्रकरणात त्यामध्ये जखमी होऊन एका बैलाचा मृत्यू झाला होता.

 

Published on: Apr 11, 2022 05:46 PM
Video : फोन टॅपिंग करणं धक्कादायक- जयंत पाटील
Video : किरीट सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने अर्ज फेटाळला